थेट बांधावरील सर्वोत्तम निरोगी, ताजी व आरोग्यवर्धक फळे आणि भाजीपालाहे शेतकरी उत्पादक कंपनी निर्मित मूल्यसाखळीच्या माध्यमातून नाशिक शहरातील नागरिकांना उपलब्ध व्हावा याकरिता 'देवळा व्हेन्चर' संचलित ‘फार्म टच' या ब्रँड अंतर्गत 'सर्वोत्तम गुणवत्ता आणि रास्त दर' या तत्वावर शेतमाल विक्रीच्या मेरी लिंक रोडवरील पहिल्या आधुनिक दालनाच्या सेवेचा शुभारंभ आज करण्यात आला. दालनाचे उदघाटन 'देवळा वेंचर'चे अध्यक्ष श्री. केदा (नाना) आहेर यांच्या हस्ते पार पडले.
कृषि विज्ञान केंद्र - मालेगांव, भा.कृ.अ. परिषद कांदा आणि लसुण संशोधन संचालनालय (DOGR), राजगुरुनगर (पुणे) आणि कृषि विभाग (महाराष्ट्र शासन) यांच्या संयुक्त विद्यमाने कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्याकरिता (FPOs) ‘शास्त्रीय कांदा लागवड’ या विशेष सत्राचे आयोजन दौलतराव आहेर ग्रंथालय, दौलतनगर (देवळा) येथे करण्यात आले होते. कार्यक्रमप्रसंगी प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विजय महाजन आणि कृषि महाविद्यालय धुळेचे सहाय्यक प्राध्यापक प्रा. श्रीधर देसले या मान्यवरांनी शेतकऱ्यांना कांदा पिकातील वाढत्या समस्यांच्या विषयाच्या अनुषंगाने सखोल मार्गदर्शन केले.